Followers

Thursday, October 30, 2008

मग मी असा ..शांत ...


Click on the image to Read the text.

-Nikhil

Tuesday, October 28, 2008

जॉली

जॉली
~.~.~
(purwant.blogspot.com)

एक

Thirty second story ...going down ...टिंग...
संध्याकाळचे ६:३० आणि DBS TOWER मधल्या ४५ व्या मजल्यावरील office मधून खाली निघालो की लिफ़्ट ची अगदी passenger train होते. प्रत्येक मजल्यावर अगदी थांबत थांबत मग १८ वा मजला आणि मग लिफ़्ट बदलून ..पुढचा प्रवास ...
त्यातल्या त्यात सिंगापुर लेडीज डॉमीनेटेड आहे म्हणून बरे ..२५ – ३० वयाच्या (आणि काही तशा दिसण्याची desperately कोशिश करणा-या ) कमीत कमी दहा पोरी तरी (सगळ्या चिंक्या लुकड्या असतात usually त्यामूळे ...माझ्यासारखे एक दोन जाडू लोक आणि १० ते १२ बायका आरामात एका लिफ़्ट मध्ये येतात). आणि मग त्यांचे ते नटणे ...आधीच नटलेल्यांनी नाजूक बोटांनी अजूनच नाजूक मोबाईलवर ट्च ट्च ..करत एसेमेस टाईप करणे ..हे सगळं होत होत छान वेळ जातॊ.
शॆवटी मग ..फ़र्स्ट फ़्लोर ..वर ..एक अथक थकलेला जिव ..मी आणि ब-याच बाहूल्या बाहेर पडतात ...पॉंड्स..की फ़ा ..की आणि कशाचा तो फ़्रेश वास ...१० – २० स्क्वेअर फ़ुटांचे आसमंत भरुन टाकतो...
मग एम आर टी (ट्रेन) स्टेशन मधला तो सँडलचा टॉक टॉक आवाज अगदी लयबदध, काही म्हणा पोरींच्या बाबतीत हा देश नंदनवन आहे. बघा मूलींबद्दल बोलत बसलं की अस्सा ट्रॅक सुटतो. कालच चेतन भगत चे नवे पुस्तक संपवले एका ठिकाणी तो म्हणतो ’ why cant we stop noticing beauty?' खरचं आहे ते.
अशाच एका शुक्रवारची गोष्ट, 16th floor वर आणखी एक चिंकी लिफ़्ट मध्ये आली ....दाटीवाटीने सगळ्या बायका एकत्र एडजस्ट करत्या झाल्या ! ही यायच्या आधी १४ म्हंजे आता एकूण १५ ..वाह आज रेकॉर्ड होतेय...की काय ..याआधिचे १२ पोरींचे होते. अशा ब-याच गोष्टी आपण मोजतॊ, नोट करतो नाही? म्हंजे टपरी पासून ते माझे घर ..३८० पावले ...शाळेच्या बस स्टॉप पासून ते कच्छी दाबेलीची गाडी १०४ ...(यावर मी १० एक वेळा दाबेलीचीच बेट जिंकली आहे), आज्जीच्या घराबाजूचा भय्या सकाळी बरोबर साडॆ चार कप चहा बोहणी म्हणुन बाहेर फ़ेकतो, जोशी वडेवाले बरोबर ९ वेळा तेलात वडा वर खाली करतात ...एनीवेज ... तर ही १५ वी, माझी रेकॉर्ड ब्रेकींग हिरोइन...मझ्या नजरेतले कौतूक कळले वाटते तिला.. छानसे स्माईल दिले ...डॊळे अजुन छोटे झाले ..मीही हसलो...
कधी कधी नाती अगदी आख्या दिवसासाठी बांधलेली असतात ...सकाळी भेटलेली व्यक्ती मग ..दिवसभरातून १० वेळा तरी भेटते, मग आपण ’ काय तूम्ही तर काय आज पाठलागावरच आहात’ अस्से काही म्हणतो. आज बहुतेक मी हिच्या पाठलागावर होतो. कारण ट्रेन मध्ये परत हि बाजूला बसायला, मूहुर्तावरच बाहेर पडलो होतो जणू. लिफ़्ट मध्ये असल्यापासून बघत होतो हि बया हाताचा तळवा पुन्हा पुन्हा पुसत होती. ट्रेन मध्ये पण चुळबूळ चालूच, एकदा दोनदा मला हात लागल्यावर ’ सॉरी ऑं?’ चिंक्या लोकांचे हे आहे, सॉरी म्हणतात आणि confirmation मागतात.
'its ok' मी.
’its that damn ink you see,' हातावरच्या ठिपक्याकडे लक्ष वेधून ती म्हणाली.
जोरजोरात पुसून लाल झालेल्या तळव्यावर अंगठयाच्या खाली एक ब-यापैकी मोठा काळा ठिपका होता.
'its the card printing ink .. it wont go for days ..' आता अगदीच रडवेलीशी होत ती म्हणाली.
तिची धडपड चालुच होती.. एक दोन स्टेशन्स गेल्यावर मग मीच विचारले,

'So you work in DBS too?'
'ya card tagging printing 16th floor. u?'
'45 th floor ATM project'
'ok'

परत नवीन टिश्यू ...परत हात चोळणे ..

'you said it wont go for some days ..so why are u trying so hard? ..let it be, So you got a Jolly whats big deal?'

'I am trying to lighten it up .. have a date tonight ..jolly ? whats that ..?'

जॉली !!!!
किती दिवसांनी म्हणतोय हा शब्द.
काही शब्द, काही वास, काही गाणी कुठल्या कुठे घेऊन जातात. मोठयाने म्हणा बरं.... चिनी मनी बोरं किंवा म्हणा सहामाही परीक्षा..... किंवा ७ च्या बातम्या ..त्यानंतरचे हॅलो ईन्सपेक्टर किंवा डबल डेकर बस, शाळेतले रंगीत खडू, घंटा
कित्ती गोष्टी आठवतात नाही?
जॉलीला आम्ही जॉली म्हणायचो तूम्ही काय म्हणायचा हो?
३री की ४थी पासून पेनने लिहीने allowed झाल्यापासून पोरे हातावर काळा वा निळा ठिपका रंगवून यायची, आणि मग ज्या ज्यांशी जॉली लावली आहे त्यांचे हात चेक करायची जॉली नसेल तर मग ५ पॉईंट्स, काहीही १.२५ रु चा वडा पाव .. खारे दाणे अगदी काहीही...
सकाळी सकाळी शाळेत,
“जॉली ! , तू दाखव ना ...ए आत्ता काढु नकोस ...साल्या चिडू नकॊस"
“गप्पे तो ठिपका नाहीये, काही "
“च्यायला ही तर कालचीच जॉली आहे आंघोळ नाही का रे केलीस? “
हे सगळे ऎकू यायचे

बॉल पेन ने काढलेली जॉली आख्खा दिवस टिकायची
त्यामुळे शाळा सुटतानाच्या जॉली सेशन साठी ठिपका रंगवायचे लक्षात ठेवायची गरज नसे.
बॉल पेनचा तो ठिपका घासून धुतला नाही तर दुस-या दिवशी हि पुसट पुसट असायचा. कधी कधी मग त्याचा बेनिफिट ऑफ डाउट मिळून जायचा.

पण हे सुख फ़ार कमी जणांना मिळायचे, कारण घरुन शाई पेनने लिहिण्याची सक्ती (अक्षर छान होते म्हणे ..)
आमच्या घरीतर शाई पेनचे इतके फॅड होते कि विचारू नका, एकदा मला धडा दहा वेळा लिहून आणायची शिक्षा झाली होती ...आता त्यात अक्षर चांगले काढायची काय गरज? पण मला बॉल पेनने लिहिताना बघून आई इतक्या जोरात " निख्खिल !!!!!!” अस्से ओरडली होती कि, ...मी एखाद्या अफ़्रिकन पोरीशी लग्न करून तिला आईच्या पाया पडायला घेऊन आलो होतो जणू.
यावर कडी म्हणजे speed कमी होतो तर " मी बोर्डाचे पेपर बॉल पेनने लिहू का?” यावर तर आईची प्रतिक्रिया मी एखाद्या अफ़्रिकन पोरीशी लग्न करून मग मला एखादे पोरगे झाले आहे आणि त्याचे नाव मी काही उझबेक की दोदी-अल ठेवले आहे ...अशी होती.

ते असूदेत ...

या जॉलीचे १० पॉईंट्स साठवून मग बॅलन्स करायला म्हणून धपाटा मारणे, नव्या सायकलच्या १० राउंड्स घेणे, home work करून घेणे हे सर्व चालयचे.

यातले जितके तिला रिलेव्हंट वाटेल ते तिला सांगितले. एव्हाना तिचे हात पुसनेही कमी झाले होते.

मला अशी सुपरफिशियल गोष्टींसाठी त्रास करून घेणारी माणसे बिलकुल आवडत नाहीत. त्यांना हलवून मग विचारावेसे वाटते "ठिक आहे रे बाबा, इतके काय बिघडले? रडू नकोस लेका. एक दोन सामोसे खा दोन एक कप चहा हान अन बालगंधर्व पूलावर बसून पोरी बघ की, टेंशन काय आहे भावा?”

'So India?'
’हं या’
'I heard its good'
'very'
'u here for?'
'for some work'
'ohh ok ..I see u everyday either morning or evening in lift or in bridges (food court 3rd floor).... u look like that terrorist with ur beard ..'
च्यायला ..(हे मनात)
'no but i am not ...any terr..'
'ya of course, i know now'
तिचे ते हाताकडे परत परत बघणे सुरु झाले होते....
'Look, I tell you what .. '
'Joyce'
'I'm Nikhil, Ya Joyce ..tell u what .. until ..u have that spot ..I will too sport one...on my hand .. lets play
Jolly ..den u wont feel that bad ? can?'
'Sure I dont have much choice but u ? nikkeel is it..?'
मी बॉल पेन काढले, (फ़र्स्ट टाईम बॉल पेन जॉली वा .... brilliant ..)
आणि माझ्या हातावर एक ठिपका रंगवला.
'ya, thats correct, nikhil, Jolly joyce.. show me urs ..'
ती हसली.
'ok ok my station...' मी म्हणालो आणि निघालो.
'See u on monday .. ' ती म्हणाली 'be ready to treat me, my jolly is permanant ..for next some days .. u might forget ..'
'sure, will see bout that .. joyce, all the best for ur date bye'
'chaao'

दोन

आयुष्यात गरज असताना पेन न मिळणे हजार वेळा तरी झाले असेल, ही एक हजार एकव‌ी वेळ.
लंच टाईम, ब्रिजेस मध्ये मी Joyce ला आधीच स्पॉट केले होते. तिच्या माझ्यामध्ये दहा लोक तरी होते. तिने बहूतेक मला नव्ह्ते पाहीले. पोरं पोरींना आधी शोधतात, कारण दिवसातला बहूतेक काळ त्यांच्या डोक्यात "पोरगी पोरगी पोरगी पोरगी पोरगी पोरगी ........" असे लूप मध्ये चालु असते....
पेन शोध आत्ता मूर्खा !!!!
लाईन मध्ये पुढे एक पोरगी ...तिला पेन मागितले तर तिने तिच्या पर्स मध्ये हात घातला ..आणि घुसळायला लागली...झाले ...४ ५ कंगवे ...२ एक पिना ...इथे काय पेन नाही मिळत ...बा....
मागे एक ऑस्ट्रेलियन जाड्या

'Can I have your pen please'
'Surremate .. ' (बरोब्बर ऑस्ट्रेलियनच!!)
जॉली बनवली, आता नो फ़िकर ...
'here man .. ur pen, thanks..'
'surre ..hey but whats that for ..'
'just some reminder ..'
'strange mate ..'
'hmm it is' मी हसत म्हणालो.

चायनीज लोक काहीही खातात ...अक्षरश: काहीही
कुठल्यातरी सूप मध्ये तीन चार अर्धे बटाटे उकडलेले ....आणि नूडल्स्‌ आणि चिकन पिसेस्‌ ..लगदा नुसता.
घेउन हि समोर उभी ...

'show show ..'
'here ...' मी हात दाखवत म्हणालो ....
'waau .. thats fresh, now is it not?'
'did u ..?'
'yes i did.... see u .. borrowing from steve ..he is my boss ...so always one eye on him ..' कित्ती छान हसते ही ...
'ohh busted then ... so when do i treat u? huh ?'
'ummm lemme see, lemme see, hmmmm .... ...i already paid for this .. so ..evening ..? subway ?'
'sure'
' ..83452188 .. '
'what?'
'my number silly .. you planning to meet me in elevetor again? or what? dont escape this, my first jolly treat ..first good thing happeneing cuz of this spot..'

ठिपका बराच गडद आहे... कित्ती वेळा हिला चारावे लागणार आहे ?
त्यात हे लोक जेवले की हात धूत नाहीत ...हिची जॉली बरेच दिवस टिकणार आहे बहूतेक.

ठिकाय......

7 PM माझा एसेमेस ...

hi, Nikhil here .. ready for ur treat?

7.01 PM
Hey Nikkil ..Starving ..which floor u?

7.03 PM
ground in front of tower ..

7.04 PM
Already? ...gimme ..2 mins .. be there ..ok bye ...

7.25 PM ....हे हिचे 2 mins ...
'Hi hello hello ..nikkeel....hi... ' मुलींचा मला सहसा कधीच राग येत नाही... आणि आला तरी ..इतक्या प्रेमळ हाय हॅलो समोर तो टिकतोय थोडाच?

'So ur two minutes .. hmm ?'

माझ्या त्या तिरकया प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करुन आणि नजरेत ..’मूलींना इतकाच वेळ लागतो माहित नाही का? रे?’ असा भाव.
'This way ...its faster ..come come..' पाय-यांवरुन खाली जात ती म्हणाली.

सिंगापुरची संध्याकाळ छान असते ...आख्ख्या दिवसात दमटपणामुळे शिणलेले अंग गारश्या झुळुकेने खुश होउन जाते.

सब वे सॅंडविच...
बाप रे कित्ती खाते हि ....बारीक तर आहे वाटत नाही इतकी Capacity असेल म्हणून.
६ इंच सॅंडविच त्यात १० वेगवेगळ्या भाज्या, मस्टर्ड, मीट लोफ़ ...
अजून काय काय ऑलिव्ह वगैरे ... सगळं पाहिजे ...


'u sir ..?'
'just one simply salad sandwitch ..and orange juice..thank you'

'16 Dollars 40 cents..'
'here'
'Thank you sir, here ur sixty cents..'

'So how was date the other day ...?' मी बसूपर्यंत हिने, जाते सुरू केले होते चरक चरक चरक....चरत होती ..जशी.
'vely gool .. ' सॅंडविचने भरलेले तोंड ... मस्टर्ड चा ओघळ टिपताना तिची गडबड ...’no one noticed la!' (आपण जसे ok रे, नो रे असं हिंमराठी बोलतो ना..तसं हे लोक ओके ला, शुअर ला ...नो ला असं म्हणतात)
'of course no one would notice, that small thing, ....u r quite beautiful' ...हेच हेच मी मिस करतो आपल्याकडे ...आता एखाद्या सुंदरश्या कोब्री (को. ब्रा. पोरीला) ’छान दिसतेस’ अस्से सपक वाक्य ही राग आणेल की नाही. आपल्याकडे उस्फूर्त स्तुतीतही लोक हेतू का बरं शोधतात? इथे ती भिती नाही, यु कॅन स्पिक युअर माइंड.

'thanks.. ऑं?' (परत तेच, confirmation ..)
'its ok...u do look nice i mean it' मी तिच्याकडे बघत म्हणालो.
'So whats ur story ?'
'Story ? there is no story .. '
'I mean what u do ? in india ..all that'

मग मी कसा पुण्याचा आहे, आणि माझे सगळं कसं पुण्यातच्‌ आहे ते सांगितले....

'punnet .. where is punnet ?'
'its near mumbai bombay u know ?'
'mmm bombay ..yah la ..know that one..already..'
'bout u?'
'Malaysia, KL, working here for sometime .. den go back ..'
'Ur boy friend?'
'in Malaysia ..'
'Here?'
'Also have .. one..but no serious la ..'

हिचे सॅंडविच संपून एव्हाना हिने माझा orange juice पिणे सुरु केले होते.

सिंगापुर पुर्वी मलेशिया चा भाग होते, पण एक ४०,४३ वर्षांपूर्वी मलेशिया वाल्यांनी त्यांना वेगळे फेकले, पण या लोकांनी अस्सा काही देश बनवला की, आज मलेशियंस एकडे काम करायला मरतात. हे एक बेट आहे, स्वत:चे पाणीही नसलेला हा देश, पाणी मलेशियाकडून भाज्या वगैरे भारत चीनकडून... अस्से चालले आहे यांचे. इन मिन 700 Sq KM क्षेत्रफळ (पुणे 704 sq KM एफ वाय आय).
’You want some juice ?' बॉटल सरकवत ती म्हणाली
’I can not have it now, I am veggie and u just ate meat !!'
’ohhh, sorry sorry, you want another one?' अपराधी स्वरात ती म्हणाली
'no, its ok'

'So what about you? Nikkiel? your Girl Friend stays with you or back in india?'
concepts फ़ारचं कच्चे आहेत हिचे ...बाई भारतात असले काही नसते गं ...पण अस्से सांगून उगीच सगळ्या भरतातल्या पोरांची का लाज का काढा?
'no girlfriend..' मी वार झेलला ...आह ..खच्याक....
'how? no beautiful girls in punnet?'
'no there are ..in PUNE ..but they are not accessible ..' PUNE शब्दावर स्ट्रेस देउन ...मी
'what u mean ?'
मग मी तिचे पुण्यातल्या मूली यावर एक दहा मिनिटे ...आणि मग ...arranged maraiage ...shaadi.com etc...वर एक दहा मिनिटे ....बौद्धीक....घेतले. त्यात शंभर वेळा तिचे "are you kidding?” “what are u saying!!” झाले.

8:30 PM

'Which station u want to walk to ..?'
'Raffels place?'
'Ok..'

ट्रेन मध्ये ही गर्दी ....
ती कुठेतरी लांब उभी ...i-pod अशावेळी बेश्ट कामी येतो.

तीन

पुढचे तीन चार दिवस मग मी न चुकता जॉली काढून निघायचो, पण छत्री घेतली की पाऊस पडत नाही, हि काही एकदाही भेटली नाही. मलाही काम वाढले होते त्यामूळे जास्त काही वाटले नाही.

फ़्रायडे अगेन्‌ ...
सकाळचे नऊ, टॉवर वन्‌ लिफ़्ट नंबर चार,

'hey hi ...'
'nikkil ..jolly?'
'ya here .. see' छत्री पाऊस योग हा.
'yaaa ... see mine .. already fading ..'
'ya ...another 5-6 days it will be gone ..i guess ..den i need not ..put spot on me '
'Ya ...'
'So Another date tonight ?'
'No that stupid pig is going to watch race.. the whole weekend'

सिंगापुरमध्ये Formula One Night race होणार होती शुक्रवार, शनिवार आणि रविवार ..तीनही दिवस.
मी इथे येण्याआधी तिकीटे संपली होती.

'Nikkil? meet me lunch @ 1.30?'
'Of course, Call 15 mins early'
'Ok ok Sure..' 16 th floor ला बाहेर पडत ती म्हणाली.

'Lunch ? I am starving...'
'Wait its just 1 ..u r always starving..'
'no u should eat too ..its too late lah..'
'ok coming ..'


'So u too watching race tonight ?'
'No never got tickets ..all sold ..'
'Good ...' 'oops I mean ..u want to take a walk ?'
'Where ?'
'ECP?'
'With you?'
'No ...you alone mostly ..cuz I will turn into a ghost at the strike of ..7 ..'
आता 'Oops ' म्हणायची माझी वेळ होती ...पोरगी हुशार आहे !
'Ya sure what time ? but .. I am getting free at 5 itself today ..'
'530 ok by u?'
'quite'...

नव्या दोस्तीतले म्हणा की नात्यातले पहिले काही दिवस कित्ती फ़्रेश असतात,
म्हणजे १०० एक रोज भेटणा-या सुंदरश्या चिंक्यांची मी १ Joyce आणि ९९ non-Joyce अशी विभागणी केलीये, आणि एक लक्षात आलेय माझ्या ...सगळ्य़ा चिनी पोरी सारख्या नाही दिसत.. .

ECP,
East Coast Park.

समुद्र खरचं end-less असतो,
मी पहिल्यांदा गणपतीपुळयाला पाहीला होता ..वेड लागले होते त्यादिवशी, ते अजूनही कायम आहे.
मझ्यामते समुद्र आणि पाऊस या जगातल्या पहिल्या दोन सुंदर गोष्टी आहेत. तिसरी म्हणजे interesting company.

म्हणजे दोन गोष्टी .... समुद्र आणि joyce तर होती ठिक आहे पावसा माफ तुला.

सायकली भाड्याने घेऊन आम्ही फिशींग डेक कडे निघालो,
Universal Truth,
पोरींचे ड्रायव्हींग वाईट असते.

हे फिशींग डेक म्हणजे समुद्रात आतपर्यंत गेलेले एक extention आहे. शेवट्पर्यंत गेलो कि मोठया मोठया बोटी फ़ारच जवळ वाटतात अजस्त्र अगदी.

अगदी ठरवून नव्हतो गेलो त्यामूळे कॅमेरा नव्हता मग मोबाईलनेच काही फोटो काढले.

एखादं माणूस कित्ती "लाईव्ह" अस्सू शकते?

तिथल्या लोकांकडून गळ आणि एकाची माशांनी भरलेली बास्केट घेऊन समोर ऊभी ..

'ok take it fast ...they want their fish ..'

'ok ok show show ...ya good picture ..i caught so many fish ..will make sushi now.. '

मग आम्ही ब-याच गप्पा मारल्या.

'So joyce this boyfriend of urs ..does he love u? i mean whats the deal here?'
'Nopes No love ..yet... just being around ...'
'The Malaysia one ?'
'He also dont i guess ...'
'Then how ?'
'I enjoy their company ..it gets bored otherwise in the new city ..dont u..?'
'Its just being indian ...I am not used to this kind of attitude ...in there if a couple is together ..they are
together .. for ..ever .. i mean its a different setup ..there'
'Ya i can think ...from what u said the other day ..'
आणि मग थोडे serious होतं ..ती..
'I love their comany ..like how i love urs .. so my boyfriend count is one plus ..'
'Who me !!!!!' मी
'Ya dont u like me?' आणि मिष्कील हसूं ...मघाचा seriousचेहरा म्हणजे नाटक होतं तरं
'Of course .. i do ..' अशा वेळी काय बोलयचं मला कळत नाही ...
'Hey dont be so serious .. feeling hungry ?'
'Nopes .. '
'But I do ..' आपल्या सपाट पोटावर हात ठेवून ..आणि ते अजूनच आत खेचून ती म्हणाली
'of course u do ...'

आपल्याकडे चौपाटी आहे नं ...तशी नाही पण एका सेपरेट एरीयात बरीचशी खाण्याची दुकाने आहेत, समुद्रापासून बरीच आत.

'you wont get any veg here .. '
'I will have coconut, some hot ..milo its cold here ..strange Singapore, is never cold ..'
'Yuhhh what is this ?'
'Chua chi fill'
फ़ारचं डेंजर होते ते, लाल लाल नूडल्स आणि लाल लाल कुठलेतरी meat. आणि ऑफ कोर्स सूप, पण तेही लाल.
बकासूर आहे नुसती...

'Aaah so hot .. gimme some of ur milo .. ' हा हू करत ती म्हणाली..
'no, I cant have it then ..u r eating ..non veg ..'
'Come on ..I just said ur my boyfriend ...now what else u want me to do ..to give me that milo ..?' तोंड भाजलेय ...डोळ्यातून पाणी येतेय तरी मस्तीखोरपणा आहे तसाच.
'ok I will get a new ..one ..u have this ..'
'Thats like my boyfriend ..'

सिंपल रुल ...

संध्याकाळ छान गेली की रात्र वाईट जाते.
ब-याच जर - तर चा विचार करत आपण मग थकून झोपी जातो ..घड्याळ वेड्यासारखे धावून ४ ५ पर्यंत पोचलेले असते.

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस म्हणजे ४८ तासांचे नसतात ते असातात ...दोन तीन फार फार ऊशीरा उठवणा-या झोपांचे आणि काहीबाही विचार करत लागणा-या आणिक छोटया झोपांचे.

चार

जॉली रंगवून जायची मलही सवय झाली होती. पण तीन एक दिवसांत माझी जॉली पार्टनर काही भेटली नाही.
नाही म्हणायला काही एसेमेस आले,
'working?'
' why so busy la?'
'mind a bite ?'

पण मीही कामात होतो त्यामुळॆ तासाभरनंतर कधी तरी रिप्लाय करायचो ..तोवर हिचे आटपलेले असायचे.
एकदा संध्याकाळी MRT मध्ये दिसली खरी ..वेडी लांबूनच हाताने खूण करून " जॉली ?” असं विचारत होती मी हात दाखवल्यावर ..जॉली बघून उगीच खोटं नाराज झाली, मग हसली.

मग अशाच कुठल्यातरी week-day ला लंच मध्ये ...आरे आज ही इतकी लेट कशी? दोन वाजेपर्यंत कंट्रोल कसे केले बकासूरीने आज....
मी आपण भॉ करतो ना त्या जोशात....

'Joyce ...Jolly ...?'
'Hey !!! Hi, Gone already ....'
तिचा तो नितळ हात मला अगदीच पोरका वाटला.
'Ohh ..good for u..' मी ...
'Ya ..but it was nice playing jolly with u.... If i get that dot once again ..den we can play again .. '
'Ya we can ..'
'Ok ..i am in a hurry nikkil ..i'll see u when i'll see u ..ok bbye ..'
बरेचसे जेवण तसेच ठेवून ...ती निघाली काय झालेय हिला ..डायटींग चे भूत शिरले की काय?
आरे मोबाईल इथेच ठेवून गेलीये ..येईल परत...बरचं आहे...याला ...Harmless असुरी आनंद म्हणतात..
आली ...कित्ती घाई ...
“hey ...Hi” ...मी मोबाईल देत म्हणालो
“hi...came for this and also forgot to tell you I got a job in Malaysia, Joining next week So many Formalities to cover ..thats why late lunch...will call you about that? In a real hurry nikkil...”
“ya anytime ...Sure Bye...Congrats ...”
“Thank you thank you.. I go now ...”

खूप दिवस जवळ असलेली, लळा लागलेली एखादी गोष्ट हरवली आहे का तुमची? एखादा आवडता शर्ट, आवडता कुणीतरी दिलेला पेन?
सवय झालेली कुठलीही वस्तू ...व्यक्ती ..?
सुट्टीनंतर आज्जीच्या घरून जाताना एसटीत बसल्यावर आलेले रडू ....
किंवा
एखादा team mate, cubicle सोडून गेल्यानंतरचा next working day ...
किंवा घर बदलताना जुन्या घराचे ते केविलवाणे बघणे ...तुमच्याकडे ..

Joyce जाणार ऎकून मला ...असेच ...
त्या क्षणात चेह-यावरही आले असावे बहूतेक. ..

शुक्रवार ....
सकाळी इतके दिवस जॉली काढायची आठवण रहावी म्हणून आरशासमोर ठेवलेले पेन उचलून जागेवर ठेवले...

जाणारे माणूस ...जितके आवडते अस्सेल तितके ते जाताना त्याला भेटणे नकोसे होते. खरं तर Joyce माझी कोण होती माझं तिचं काही नातं नव्हतं किंवा तसं ते निर्माण होण्याचा स्कोपही नव्हता, पण काही माणसं आवडून जातात हे खरं, मनाच्या ओढीला नात्याचे किंवा अगदी मैत्रिचेही कोंदन चढवायलाच हवं का ?

कसा तरी आजचा दिवस जाउदेत ...बिझी आहोत संगावे का? फक्त फोनवरच होऊन जाईल ..असं बघावं क? कोणी निघून जाताना मला हे असे होते, अगदी इररॅशनल ...मुग्धा (सु-याची बायको, MBBS) मला काय ते Seperation Anxiety आहे अशी म्हणते ..खरं असावं ते.
कॉल:

'Nikkil ..i am outside .. near lift ur floor ..come no?'
जॉईस !!
'He hi, how are u ?
'My phone was off ..in meeting..I thought u would have called ..right?'
'aaah ..i mean ..'
'So anyways ...Leaving tomorrow morning ..lots of packing to do ..have to return phone too ..in contract .. '
'ohh, good ..'
'Thanks ..for everything, I will never focus on small imperfections ...now..'
'Thats good .. Joyce'

.....
...
.

असा सायलन्स तूम्ही कसा भरून काढता हो?
काय बोलू?
की
’जॉईस तू जावसं मला बिलकूल वाटत नाहीये. मला तुझी सवय झालीये. तू खुपचं छान आहेस. आणि मी एक नंबरचा मूर्ख आहे, रोज जॉली मूद्दाम विसरून तूला ट्रीट द्यायला हवी होती.”
अत्ता विचार करताना वाटतयं, अस्सं च्या अस्सं बोलून टाकायला हवं होते. तिला कुठे कळायला? मला तरी बरं वाटलं असतं ना तिला तिचे "फ़ेअर शेअर ऑफ़ क्रेडीट" देऊन.

"चाओ देन बाय ..बाय"
“बाय जॉईस"

मुलींना हग करताना कायमच अवघडल्यासारखं होते ...
आताही, कित्ती नाजूक ही ..निख्या हळूं लेका, मोडेल ती ....वगैरे .....हात कित्ती मऊ ....हे सगळं डोक्यात....

तिने लिफ़्ट्चे बटन दाबले ...
’टिंग ....’

सहा वाजलेत ..चला ....
खाली आलॊ ...
आजही ब-याच बायका ..होत्या ..
पण जाऊदेत ... जॉईस चे रेकॉर्ड तुटायला नको ...मी नाही मोजल्या.
स्टेशन कडे निघालो...
हलकं वाटणं दोन प्रकारचं असतं ...
या दुस-या प्रकाराला ...मोकळं की भकास वाटणंही म्हणतात.

'Nikkil jolly?'
!!!!
मागे वळून पाहिलं तरं
जॉईस !!! उभी, हात दाखवत.
हातावर एक मोठासा ठिपका ...आणि तो ठिपका काढायला वापरलेले पेन टक्क करून ..माझ्यासमोरच आत ठेवले. आणि हसली ...
मीही हसलो ...
'ya Joyce ....u caught me ..'
'..Hey ..So I do Get this jolly treat right ... ?' ती जवळ येत म्हणाली.
’ Of course you do ..'

घरी परतणा-या त्या गर्दीतून मग .. एक बाहूली आणि "हिला आज खुप चारुयात ..जास्त वेळ गप्पा मारायला होईल .. " असा सुखावलेला मी .. सब वे कडे निघालो होतो.

-- निखिल
(purwant.blogspot.com)

Monday, September 29, 2008

कोण खरी

खूप रागावलो मी कधी तर मग,
माझीच नक्कल करुन
हसवणारीस तू
आणि कधी स्वताच फ़ूरंगटून
बसणारीस तू
कोण खरी ?

कधी मग उगीचच साधी बस नाही मिळाली म्हणून
रडवेली झालेली तू खरी ..
की घाई घाईत तवा भाजला तरी
’काही नाही रे’ ’तू जा, उशीर झालाय ..घड्याळ काय शो साठी बांधलेस काय...’
म्हणून हसत पाठवणारी तू
खरी कोण ?

कधी दोन तासात ..फोन नाही केला म्हनून ..
चिडनारी तू ..
आणि कधी
’कित्ती वेळा फोन करतॊस रे..?’
’आज काम नाहीए का तूला ...ठेवतेय मी’
मला रागावणारी तू ...

कधी मग आशा - गुलजार ची गाणी
मला समजावून सांगणारी तू ..
की ..
कधी चल AC मध्ये बसून गप्पा मारुयात ..
म्हनून एखाद्या FLOP पिक्चर ला घेउन जाणारीस ..तू..

अगदी परवाचीच गोष्ट का गं?
रस्त्यावरच्या त्या पिल्लाला उचलून ..
जररा आत सोडून आलो तर,
’चल आता घरी जाउन हात धू ..’
की
त्याच संध्याकाळी ..
’काय मस्त होते ना रे ते पिल्लू’
’थोडा वेळ आणिक धरले असतेस तर ..
मी ही हात लावला असता ना ? अगदी मऊ असेल ना रे?’
नाराज होणारी तू

मी म्हनालॊ मग ..
’कशी अशी दोन्ही बाजूंनी बोलतेस’ तर..
’कूठल्या रे दोन बाजू .. ? मला confuse नकोस करु’, म्हणालीस ..
कोण .. confuse आहे गं ?
तू की मी की मग दोघंही.. ?

काल तूला मग विचारलेच ...न रहावून...
’खरचं यातली कोण "खरी" तू...
तेव्हा ..
’कित्ती observe करतोस .. रे मला ’ ..
म्हणून डोळ्यात पाणी आणनारी तू..
की लगेच डोळे ... नाक.. पूसून मग
’तू सगळया पोरींना अस्सेच का रे observe करतोस ..?’
डोळा मारत खिद्ळनारी तू ?

कोण खरी?
-निखिल

Hindi ..bhashantar ..

which one is you.. ?

kabhi ..gussa hota hoon toh ..
meri hi acting karke mujhe hasanewali ..
ya
kabhi khud hi ruthke baithne wali ..
tum ..
which one is really you?


kabhi ..buss nahi mili toh ..
rone pe aanewali tum ..
tum ho ya ..
kabhi .. jaldi mein tawe se jal jata hain toh ..
'kuch nahi ' 'tu nikal late hua hain tere ko, ghadi dekh toh jara, show ke liye pehni hai kya....'
aisa bolke .. haste haste bhejne wali tum ?
which one is really you?

kabhi .. do ghante mein .. phone nahi kiya toh
chidne wali tum ..
ki ..
kabhi ..
'kitne baar phone karte ho ?
kaam nahi hain kya aaj ..mein rakh rahi hoon'
daantne wali tum ?

kabhi asha-gulzaar ke gaane mujhe samjhane wali .. tum ..
ya ..
kabhi ..
chal AC mein baithke gappe marenge .. kehke ..
koi flop si se movie leke jaanewali tum. ..
which one is u ?


abhi ..parson ki hi toh baat hain ..na?
woh raste pe aaye hue ..
pille ko uthake ... andar chhod ke aaya toh ..
'chalo abhi ghar chalke haath dholo .. '
kehne wali tum ..
ya
ussi ratt ko ..
'kya mast pillu tha na ? '
'thodi der aur pakdte toh .. mein bhi haat laga pati'
aise bolke .. maayus hone wali tum .

aur firrr ..
kal meine puuch hi liya . tumhe
'seriously .. which one is u?'
'itna .. observe karte ho ? .. mujhe
kehke aakhon me paani laane wali tum .. tum ho ya ..
next moment mein ..
aankh ...naak ponchke ...palatke ...
'tum harr ladki ko aisehi observe karte ho naa ?'
aise haste haste kehte .. aankh maarne wali tum tum ho ..
which one is u ?

- Nikhil (29th Sept 2008)